Monday, August 24, 2020

संविधान, गणपती व प्रवीण तरडे

अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी गणेश स्थापना भारतीय संविधानाच्या पुस्तकावर गणपतीची मूर्ती बसवून केली. काही लोकांना याचा राग आला आणि त्यांनी त्याबद्दल निषेध हि केला. कोण आहे हि लोक ज्यांना संविधाना च्या अपमानाचा राग येतो ? हा राग सर्वानाच यायला हवा कि नाही? कि अजूनही या देशात संविधानापेक्षा धर्म व धर्म ग्रंथांनाच जास्त महत्व दिले जाते ? आणि जर प्रवीण तरडे हे त्यांच्या झालेल्या चुकीसाठी जाहीर पणे माफी मागत असतील तर त्यांना माफ करणे किंवा समजून घेणे योग्य नाही का? 

सांगायचंच झालं तर संविधान हे कोणत्या एका जातीच्या किंवा ठराविक सामाजिक समुदायाची मालमत्ता नाही कि जिचा प्रमाण झाला के नाही हे तोच ठराविक समाज ठरवणार, आणि जर अपमान झाला असेल तर तोच ठराविक समाज त्याचा निषेध करणार. या सर्व प्रसंगांमधून दोन गोष्टी तर खरोखरच सिद्ध होतात:

१) बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे विचार मानणाऱ्या लोकांनाच संविधानाशी घेणे देणे आहे. त्याचा आदर आहे. त्यावर श्रद्धा आहे. 

२) इतर समाजाला संविधान फक्त आहे म्हणून आहे असेच वाटते. त्यांचा संविधान या शब्दाला देखील विरोध आहे. जर हेच कृत्य जर गणपतीच्या मूर्ती खाली कोणताही एखादा धर्म ग्रंथ ठेवून केले असते तर, धर्म ठेकेदारनाकडून होणार निषेध हा हिंसक हि झाला असता. 

सांगायचे तात्पर्य हेच कि अजूनही आपल्या देशात संविधानापेक्षा हि जास्त महत्व त्या धर्म ग्रंथाना दिले जाते जा धर्म ग्रंथांनी धर्म, शास्त्र व समाज या नावाखाली हजारो वर्षांपासून लोकांचे शोषण केले. मात्र ज्या संविधानाने त्यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला, त्यांच्या घरातील स्त्रीला समाजात मनाचा दर्जा दिला, अशा संविधानाचा मात्र अपमान सहज सहन केला जातो. याउलट, जो संविधानाच्या अपमानाचा निषेध नोंदवत असतो त्याला मात्र जबरदस्त ट्रॉल केले जाते. 

ज्या हि लोकांना संविधानाबद्दल इतके प्रेम आहे (जास्त करून ते जे बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या विचाराना मानतात) त्याही लोकांनी संविधानाला 'धर्म ग्रंथ' एखादे धर्म ग्रंथ न समजता, आपला निषेध नोंदविताना धर्म कंटकांप्रमाणे आक्रमक होणे टाळावे. प्रवीण तरडे आर. एस. एस. चे होते, कि आहेत कि नाहीत, या गोष्टीत न जाता, त्यांनी मागितलेली जाहीर माफी स्वीकारून त्यांना मोठ्या मनाने माफ करावे. किंवा संविधानाचा अपमान केल्याबद्दल जर कोणत्या प्रकारचा गुन्हा नोंदविता येत असेल तर तसे करावे. कारण जर आपण संविधानालाच धर्म ग्रंथ मानून बसलो तर, त्यातूनही आपला कट्टरतावाद दिसून येईल. जशी धर्म या संकल्पेनेची कट्टरतावादने वाट लावली तशीच स्थिती संविधानाची होईल. 

संविधान हा धर्म ग्रंथ नाही. त्याला धर्म ग्रंथापेक्षाही महत्वाचे स्थान आहे या देशात. मात्र त्याच्या अपमानाचा निषेध करताना निषेधाचा मार्ग च त्याचा अपमान आर्त तरी नाही याची काळजी घ्यायला हवी. 

नुकत्याच एका मित्राशी झालेल्या गप्पांचा एक भाग सांगू इच्छितो. तो मित्र रस्त्यावर सिगरेट पित म्हणाला, "संविधान खरंच काही फायद्याचे नाही, या पेक्षा हुकूमशाही बरी." अश्या सर्व मित्रांना हाच एक साधा प्रश्न विचारावेसे वाटते, "संविधान ऐवजी हुकूमशाही असते तर तुला  फुटपाथ वर उभं राहून सिगरेट पिताना पकडून तिथेच चोप दिला असता." हि तीच लोक असतात ज्यांना नागरीक शास्त्र शाळेत असतानाही काहीच समजलेलं नसत आणि आता वयाने मोठे झाले तरी काही समजून घ्याची मानसिकता नसते.

असो, संविधानाचो आदर मात्र सर्वानीच करायला हवा. 

जय भारत. 

Image courtesy: https://www.loksatta.com/manoranjan-news/marathi-actor-director-pravin-tarde-apology-over-ganeshotsav-celebration-sgy-87-2252763/


No comments:

Post a Comment

RETHINKING THE PURPOSE OF HOMEWORK

In education in India, homework has long been viewed as a staple, a marker of a student's engagement with academic material. Yet, the qu...