Friday, May 24, 2019

पाहिलं आज दृश्य


पाहिलं त्याला आज ...
भुकेसाठी कॉम्प्रोमाइज करून 
भीतीच्या अंधारात मरत-मरत जगताना. 
जीभ कापल्यासारखं , मुक्याच सोंग घेताना.
९ ते ५ ची डयुटी  करून डाळ भात खाऊन झोपताना.
पाहिलं त्याला ... रोज रोज हरताना .
रिटायरमेंट ची वाट बघताना.

त्यालाही पाहिलं आज ...
दगड हातात घेऊन रस्त्यावर उतरताना,
डोळ्यातल्या रागातून पीएमटी जाळताना,
पोलिसच दांडकं पडताच जोरात विव्हळताना,
मलम पट्टी करून परत उभा होताना ...
पहिला त्यालाही ... रोज रोज झगडताना 
फ्रस्टरेशन मूळ बिघडताना .

आणि यालाही पाहिलं आज ...
शिकून सावरून मोठं होताना,
बुद्धिवाद्यांची  भाषा वापरताना,
कधी फेसबुक तर कधी ट्विटर वर निषेध नोंदवताना,
गर्दीला दिशा दाखवताना...कधीतरी जिंकताना. 
पहिला यालाही ... कधीतरी जिंकताना
दररोज झगडताना .... 

आणि पाहिलं माय बाप सरकारला 
यांच्या जखमेवर मूतताना ,
पिढ्यानं पिढ्या  सडवताना ,
एकमेकात लढवताना ,
मुडद्या च्या कपाळावरील लोणी चोरताना,
स्वतःची पॉट भरताना ... या तिघांवर हसताना 
पाहिलं माय बाप सरकारला ...
रोज रोज जिंकताना ... हसत हसत जगताना. 


 


RETHINKING THE PURPOSE OF HOMEWORK

In education in India, homework has long been viewed as a staple, a marker of a student's engagement with academic material. Yet, the qu...