दाक्षिणात्य अभिनेता रामचरण तेजा चा "ध्रुवा" नामक एका चित्रपटातील हा संवाद बहुतेक वेळा, बहुतेक परिस्थितींमध्ये त्याच्या वैश्विक सत्याची जाणीव करून देतो.
सध्या देशात होत घडामोडीना लक्षात घेता हे तर नक्की म्हणावे लागेल कि सर्व प्रसार माध्यमांना सरकारचे अपयश झाकायचे जणू पे-रोल वर काम मिळाले आहे.
या वर्षाच्या फेब्रुवारी व मार्च महिन्यामध्ये जेव्हा देशाची कमकुवत अर्थव्यवस्था व्हेंटिलेटर वर जाऊन ठेवली होती, तेव्हाच कोरोना आला आणि सर्व न्यूज चॅनेल्स ने आजारी अर्थव्यवस्थेला कोरोना जबाबदार आहे असे ठोकपणे सांगितले. हा गोगांट असाच चालू राहावा याच पुरेपूर काळजी घेण्यात आली.
तब्लिघी जमातीमुळेच भारतात कोरोना झपाट्याने पसरला असे चित्र या न्यु चॅनेल्स ने तयार केले. आणि त्यात आपल्या देशातील सुशिक्षित-अडाणी लोकांना 'आंधळेपणाने' अक्षरशः डोस देण्याचे काम केले व्हाट्सअप व फेसबुक वर द्वेष पसरविणाऱ्या पोस्ट्सने. मग काय? गेलेला काम धंदा सोडून, सर्व रोष त्या युवकाने तब्लिघीच्या मुद्द्यावर काढला. इतकाच काय कि बी.जे.पी. ची कार्यकर्ता व भारताची कुस्तीपट्टू ने त्या लोकांना 'सुव्वर' असे संबोधित केले. याच मुद्याला घेऊन भरपूर मित्रांबरोबर चर्चायुक्त भांडणे देखील झाली, मात्र त्यांचं आंधळे प्रेम त्यांना विवेक बुद्धी मान्य करण्यास अडथळा आणत आहे हे लक्षात येत राहील. या सर्व चर्चेला इतकं उधाण दिल गेलं कि देशातील जनता जीवन जगण्यासाठी काय काय जरुरी असते हेच विसरून गेली.
"मार्च २४ ला झालेल्या नमस्ते ट्रम्प कार्यक्रमामध्ये अहमदाबाद येथे लाखो लोकांचा जनसागर आला होता. त्यांतूनही कोरोना चा भयानक संसर्ग झाला असेलच कि?" अश्या विचारलेल्या 'मोदी विरोधी' मात्र विवेकी प्रश्नांचे त्या मित्रांकडे उत्तर नव्हते.
आज मुंबई उच्चं न्यायालयाने 'तब्लिघी जमातीला प्रसार माध्यमांनी राजकीय बळीचा बकरा बनविले गेले' असे जाहीर रित्या सांगितले आणि तीन महिन्यापासून माझ्या मित्रांना मिळालेल्या मनोरंजनात्म गोष्टींचा शेवट झाला. ते या मनोरंजनात इतके रमले होते कि त्यांना हेच समजलं नाही कि त्यांचा जॉब गेला आहे. त्यांच्या घराचे ई.एम.आई. पगाराशिवाय देणे अशक्य आहे, येणारी अनेक महिने त्यांना नोकरीची व ठराविक पगाराची हमी देखील नसेल. मात्र म्हणतात ना, "प्रेम आंधळं असतं", हे हि तसच.
काही दिवसांपूर्वी वाचलेल्या एक मिम आठवलं आणि ते इथं लिहावंसं वाटत:
"स्त्री चं चारित्र्य, दलितांची गुणवत्ता, आणि मुस्लिमांचे देश प्रेम यावर नेहमीच प्रश्न उठवले जातात व शंका उपस्थित केल्या जातात"
- अमित खरात
No comments:
Post a Comment